हिंदूंना त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्था यांवर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार !

अहिल्यानगर – हिंदु संघटना, हिंदुत्वनिष्ठ नेते, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात खोट्या तक्रारी प्रविष्ट करून पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या ‘सिटिझन्स फॉर जस्टीस अँड पीस’ (सी.जे.पी.) या संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ? – संपादक) अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना या संदर्भात तक्रार देण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या अहिल्यानगर जिल्हा समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर, श्री. संतोष गवळी उपस्थित होते. या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृह सचिव यांनाही पाठवण्यात आली आहे.

‘सी.जे.पी.’ संस्थेच्या कारवायांमागे हिंदुविरोधी कटाचा संशय हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु नेते यांविरुद्ध खोट्या तक्रारींची मालिका उभी करून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. या कारवायांसाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून ‘फंडिंग’ (पैशांचा पुरवठा) घेतले आहे का ? तसेच यामागे ‘डीप स्टेट’ (टीप : ‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.) आणि ‘शहरी नक्षलवाद’ यांचे काही देश आणि हिंदुविरोधी कटकारस्थान आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.