महाकुंभातील साधू-संतांच्या संकल्पानुसार भारत हिंदु राष्ट्र होणारच ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने विक्रोळीत हिंदु राष्ट्र-जागृती सभा

सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

विक्रोळी (मुंबई) – प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभात समस्त साधू-संतांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे येणार्‍या काळात भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले जाईल, यात शंका नाही, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर धर्मनिष्ठ श्री. राजेश कारेकर उपस्थित होते.

मान्यवर वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी कृतीशील धर्मयोद्ध्यांचा सत्कार मान्यवर वक्त्यांच्या हस्ते करण्यात आला. सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन सभास्थळी लावण्यात आले होते. स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सादर केली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची चित्रफीत उपस्िथतांना दाखवण्यात आली. सभेला पुष्कळ हिंदू उपस्थित होते. उपस्थितांकडून हिंदु राष्ट्र-निर्मितीच्या कार्यात कटीबद्ध रहाण्याचा संकल्प घेण्यात आला.

हिंदू वेळीच संघटित न झाल्यास भविष्यात भारतातही बांगलादेशाप्रमाणे परिस्थिती उद्भवेल ! – राजेश कारेकर, धर्मनिष्ठ

राजेश कारेकर, धर्मनिष्ठ

घाटकोपर येथील पोलीस ठाण्यात मध्यंतरी एका आतंकवाद्याला पोलिसांनी पकडून आणले होते; पण काही मिनिटांतच सहस्रो आतंकवादी पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणा देऊ लागले. या जिहादी संकटाविषयी जागृती करायला हवी. फाळणीच्या वेळी सहस्रो हिंदूंच्या कत्तली करण्यात आल्या. हा इतिहास भारतियांसमोर कधी येऊच दिला नाही. बांगलादेशामध्ये ज्याप्रकारे हिंदूंना वेचून मारले जात आहे, त्याप्रमाणे आपण वेळीच जागृत न झाल्यास उद्या आपल्यावरही हीच वेळ येईल.