Parliamentary Committee On Award Wapasi : ‘पुरस्कार परत देणार नाही’ असे मान्यवरांकडून आधीच लिहून घ्या !

पुरस्कार परत करणार्‍यांवर नियंत्रण आणण्यासाठी संसदीय समितीची केंद्र सरकारला शिफारस

जनता दल (संयुक्त)चे संजय झा

नवी देहली – संसदीय समितीने मान्यवरांकडून पुरस्कार परत देण्याच्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली आहे. पुरस्कार देण्यापूर्वी ‘पुरस्कार परत करणार नाही’, असे त्यांच्याकडून लिहून घेण्याची शिफारस केली आहे.

गेल्या काही वर्षांत देशात एखाद्या सूत्रावरून अप्रसन्नता व्यक्त करतांना किंवा निषेध करतांना पुरस्कारप्राप्त अनेक मान्यवर पुरस्कार परत देत असल्याचे दिसून आले आहे. अशा कृतीमुळे त्या पुरस्काराचाच मान राखला जात नाही. तसेच ज्या अकादमीकडून त्यांना हे पुरस्कार देण्यात आलेले असतात, त्यांच्याशी मात्र ते पुढेही संलग्न रहातात किंवा त्या अकादमींसाठी काम करत राहतात. त्यामुळे त्यांच्याकडून ‘पुरस्कार परत देणार नाही’, असे आधीच लिहून घ्यावे, असे समितीने म्हटले आहे. जनता दल (संयुक्त)चे संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती विषयावरील समितीकडून ही शिफारस करण्यात आली आहे. जर ही शिफरस मान्य झाली, तर पुरस्कार परत करण्याचे प्रकार थांबतील.