![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/27212401/modi-putin-700.jpg)
मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी २६ जानेवारी या दिवशी सांगितले की, रशिया-भारत संबंध ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी’वर आधारित आहेत. दोन्ही देश सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करत रहातील, अशी आशाही पुतिन यांनी व्यक्त केली. पुतिन यांनी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन केले.
पुतिन म्हणाले की, रशिया-भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणि द्विपक्षीय संबंध लोकांच्या मूलभूत हिताचे आहेत अन् एक निष्पक्ष बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन या वर्षी भारताला भेट देण्याची अपेक्षा आहे; परंतु त्यांच्या भेटीचा दिनांक अद्याप निश्चित झालेला नाही.