२३ वर्षीय हिंदु मुलीची मुसलमान प्रियकराने केली हत्या !

कर्नाटकमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

राणेबेन्नूर (कर्नाटक) – राज्यातील हावेरी जिल्ह्यामधील राणेबेन्नूर येथे लव्ह जिहादची नवीन घटना समोर आली आहे. मसूर गावातील २३ वर्षीय स्वाती रमेश ब्याडगी हिची तिच्या मुसलमान प्रियकर नयाज याने त्याच्या दोन मित्रांच्या साहाय्याने हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नयाज याला अटक केली आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नयाजने स्वातीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून स्वाती त्याच्यापासून अंतर राखत होती. यामुळे संतप्त झालेल्या नयाजने त्याच्या दोन मित्रांच्या साहाय्याने स्वातीचे अपहरण केले आणि तिला राणेबेन्नूरला आणले. तिथे तिघांनीही स्वातीला धमकी दिली आणि तिच्यावर नयाजला भेटण्यासाठी दबाव आणला; परंतु स्वातीने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नयाजने त्याच्या मित्रांच्या साहाय्याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह तुंगभद्रा नदीत फेकून दिला.

स्वातीची आई शशिकला यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत प्रविष्ट (दाखल) केली होती. त्याच कालावधीत तुंगभद्रा नदीत सापडलेला अनोळखी मृतदेह स्वातीचा असल्याचे पोलिसांनी ओळखले. पोलिसांनी नयाजला अटक केली आहे, तर त्याचे दोघे मित्र पसार आहेत. या घटनेचा तपास करणारे हावेरीचे पोलीस अधीक्षक अंशुकुमार म्हणाले की, तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादचा नायनाट करण्यासाठी लव्ह जिहाद्यांना फासावर लटकवणारा कठोर राष्ट्रव्यापी कायदा झाला पाहिजे !