Russia On Trump’s Appeal : युद्धविरामासाठी आधीपासूनच सिद्ध असून तुम्ही युक्रेनला सिद्ध करावे ! – रशिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या आवाहनावर रशियाची प्रतिक्रिया

युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) : राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वीही युद्ध थांबवण्याविषयी विधान केलेले आहे; पण युद्ध थांबवायचे असेल, तर युक्रेनला त्यासाठी सिद्ध रहावे लागेल. याची आम्ही वाट पहात आहोत. रशिया समान अटींवर चर्चेसाठी सिद्ध आहे, असे उत्तर रशियाने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याच्या आवाहनावर दिले आहे. ‘युद्ध थांबवले नाही, तर रशियावर निर्बंध लादू’, अशी चेतावणीही ट्रम्प यांनी दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, रशियावर निर्बंध आणि शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीमध्ये नवीन काहीही नाही. ट्रम्प यांना अशा पद्धती आवडतात. निदान त्यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात तरी त्यांना ते नक्कीच आवडले होते.