मुंबईत ‘लाडकी बहीण योजने’चा अपलाभ घेणारी बांगलादेशी महिला अटकेत !

४ बांगलादेशी नागरिकांसह एका दलालला अटक

मुंबई – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’चा अपलाभ घेणार्‍या बांगलादेशी महिलेसह ५ बांगलादेशी नागरिकांना आणि एका दलालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशी घुसखोर महिला ‘लाडकी बहीण’ योजनेस पात्र होते, यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड होतो ! घुसखोर अशा प्रकारे व्यवस्थेचे ‘लाडके’ होणे दुर्दैवी !