Chhattisgarh Korba Rape Murder Case : ५ जणांना फाशीची, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

कोरबा (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि ३ जणांची हत्या केल्याचे प्रकरण

घटनेतील आरोपी पोलिसांसमवेत

कोरबा (छत्तीसगड) – येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर ती, तिचे वडील अन् बहिण यांची हत्या केल्याच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ५ दोषींना फाशी आणि एकाला जन्मठेप, अशी शिक्षा सुनावली. ४ वर्षांपूर्वी लेमरू परिसरात ही घटना घडली होती. (उशिरा मिळणार न्याय, हा अन्याय होय ! – संपादक) या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेत दोषींना अशीच शिक्षा होणे आवश्यक आहे !