स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीने घेतली स्वामी कैलाशानंद महाराज यांच्याकडून दीक्षा !

  • नाव ठेवले कमला, तर गोत्र अच्युत !

  • गळ्यात आजन्म रूद्राक्षाची माळ धारण करण्याचा निर्धार !

लॉरेन पॉवेल

प्रयागराज – मकर संक्रातीच्या दिवशी ‘अ‍ॅपल’ या जगविख्यात आस्थापनाचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल यांनी प्रयागराज येथील महाकुंभपर्वात श्री निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्‍वर स्वामी कैलाशानंद यांच्याकडून विधीपूर्वक दीक्षा घेतली. यानंतर त्यांचे कमला हे नाव ठेवण्यात येऊन त्यांना अच्युत हे गोत्र देण्यात आले. दीक्षा घेतल्यानंतर ६१ वर्षीय कमला यांनी गळ्यात रूद्राक्षाची माळ धारण केली आणि ती आजन्म धारण करण्याचा निर्धार केला.

प्रकृती बरी नसल्याने संगमस्नान टाळले !

प्रकृती बरी नसल्याने कमला मकरसंक्रातीच्या दिवशीच्या पहिल्या अमृत स्नानाला जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे स्वामी कैलाशानंद यांनी त्यांच्यावर त्रिवेणी संगमातील जल शिंपडले आणि त्यांना त्याचे महत्त्व सांगितले. त्या १० जानेवारीला महाकुंभपर्वात आल्या होत्या. १६ जानेवारीला त्या पुन्हा अमेरिकेला जाणार आहेत.