Bangladesh Hindu Student Killed : बांगलादेशात हिंदु विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

हत्या झालेला हिंदू विद्यार्थी अर्णव कुमार सरकार

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील खुलना नगरमधील तेंटुलतला मोर परिसरात एम्.बी.ए.चा (मास्टर्स ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन – व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी) विद्यार्थी अर्णव कुमार सरकार (वय २६ वर्षे) याची २४ जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठांनी ‘सनातन प्रभात’ला दिली आहे.

प्रत्यक्षदर्शी प्राध्यापक शेख महमूदुल हसन यांनी सांगितले की, रात्री तेंटुलतला चौकातील एका चहाच्या दुकानासमोर अर्णव मोटारसायकलवर बसून चहा पीत होता. त्या वेळी काही बदमाश मोटारसायकलवरून आले आणि त्याच्यावर गोळी झाडून पळून गेले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील असुरक्षित अल्पसंख्यांक हिंदू ! बांगलादेशात बहुसंख्य असतांना धर्मांध मुसलमान जे करतात, तेच भारतात अल्पसंख्यांक असतांनाही हिंदूंच्या विरोधात करतात, यातून हिंदूंचा नेभळटपणा लक्षात येतो !