शांत स्वभावाच्या आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सौ. वैष्णवी बधाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) !

‘मागील ३ वर्षे मी भक्तीसत्संगाचे ध्वनीमुद्रण ऐकून टंकलेखन करत आहे. त्यामुळे भक्तीसत्संगाची संहिता लिहिण्यास साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैष्णवी अमोल बधाले (वय २५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) हिच्याशी माझा संपर्क येतो. तिची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. वैष्णवी बधाले

सौ. वैष्णवी अमोल बधाले यांना २५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

श्रीमती रजनी नगरकर

१. आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास

सौ. वैष्णवीच्या चेहर्‍यावर आध्यात्मिक अभ्यासाच्या तेजाची एक चमक आहे. तिला लहानपणापासून आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाची आवड आहे.

२. मायेची अल्प ओढ 

‘ती कधीच घरच्या ओढीने चिंतीत आहे किंवा तिला घरची आठवण येत आहे’, असे जाणवत नाही. ‘माझ्या सासर आणि माहेरचे सगळेचजण साधनेत आहेत’, हाच माझा मोठा लाभ आहे’, हेच तिच्या बोलण्यात असते.

३. ‘ती नेहमी अतिशय शांत आणि देवाच्या अनुसंधानात असते’, असे मला वाटते.

४. व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे सत्संग एकरूप होऊन घेणे 

ती व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे सत्संग घेते. या सत्संगांत ती साधकांना डोळे मिटून प्रार्थना करायला सांगते. तेव्हा ‘ती उच्च लोकातील वैष्णवी आहे’, असे मला वाटते. ती सत्संगाशी एकरूप होते. अन्य वेळी तिचे बोलणे वेगळे वाटते.

५. सेवा भावपूर्ण करणे

ती भक्तीसत्संगाचे लिखाण करण्यास साहाय्य करते. त्या लिखाणात विविध सण, संतांची महती, गुरुमाहात्म्य, साधकांनी कसे वागावे ?, साधकांच्या होणार्‍या चुका, साधकांचे कुटंबियांशी वागणे इत्यादी विषय असतात. ‘तिचा अभ्यास, वाचन, चिकाटी आदी तिचे नसून देवाचे आहे’, असे मला वाटते. ती संहितेचे लिखाण पुष्कळ प्रगल्भतेने आणि भावभक्तीने करते.

वरील लिखाण गुरुमाऊलींनी माझ्याकडून शब्दबद्ध करून घेतले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– रजनी नगरकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२४)