
‘वर्ष २०२४ मध्ये एक ज्योतिषी मला म्हणाले, ‘‘तुमच्या हातावर ‘ज्ञानरेखा’ आहे. त्यामुळे तुमचा ज्ञानमार्ग आहे.’ तेव्हा मला पुढील प्रसंग आठवला, ‘वर्ष २००३ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘सनातन धर्मात ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग, हे योगमार्ग सांगितलेले आहेत. तुमचा ज्ञानयोग आहे. त्यातून तुमची साधना होणार आहे.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी माझा हात न पहाता मला साधनेच्या संदर्भात वरील मार्गदर्शन केले होते. या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना साधनेच्या संदर्भात देत असलेली दिशा ही ईश्वरीय, अचूक आणि परिपूर्ण आहे’, याचा प्रत्यय येतो. ‘ईश्वराने असे महान गुरु आम्हा साधकांना दिले’, याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |