आपत्काळाच्या पूर्वी माझी बेंगळुरूची वास्तू विकून त्यातून मिळणार्या पैशांतून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयासाठी भूमी घ्यावी आणि श्री गुरुचरणी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी) ती अर्पण व्हावी’, असा विचार माझ्या मनात आला. त्याप्रमाणे श्री गुरूंच्या कृपेने केवळ ८ दिवसांत वास्तू विकली गेली; पण नवीन भूमी मिळण्यात पुष्कळ विघ्ने येत होती. नवीन भूमी शोधण्यात ३ वर्षे गेली. त्यानंतर मी संपूर्ण शरण जाऊन गुरुदेवांना प्रार्थना केली. आश्चर्य म्हणजे माझी प्रार्थना जणू गुरुमाऊलीच्या चरणी पोचली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बेंगळुरू येथे आल्या आणि त्यांनी श्री गणपति देवस्थानात जाऊन विघ्नहर्त्या श्री गणेशाची पूजा केली. त्यानंतर केवळ १५ दिवसांत उत्कृष्ट भूमी मिळाली.
ही भूमी ५ एकर असून बेंगळुरू शहरापासून ४० कि.मी. दूर असलेल्या एका गावात आहे. निसर्गरम्य अशा या देवभूमीमध्ये मोर नाचतात, कूपनलिकेला भरपूर पाणी लागले आहे आणि तेथे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी चांगले मार्ग आहेत. या सेवेत अनंत अडचणी येत असतांना गुरुदेवांनी मला पावलोपावली साहाय्य केले. त्यांच्याच कृपेने हे सर्व झाले आणि मला आनंदात अन् भावावस्थेत ठेवले. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना मला पुढील कविता सुचली.
गुरुदेवा (टीप १), सुंदरशी देवभूमी दिली तुम्ही ।
जणू वैकुंठातील अलौकिक भूमी दिली तुम्ही ।। १ ।।
सुंदर आणि सात्त्विक परिसर, निर्विचार होतो आम्ही ।
मोर नाचती तिथे, अशी अप्रतिम भूमी दिली तुम्ही ।। २ ।।
या भूमीच्या सेवेतून आम्हा साधकांची मने जुळवलीत तुम्ही ।
स्वभावदोष नष्ट करूनी अन् गुणसंवर्धन करून साधना करू आम्ही ।। ३ ।।
आपत्काळी सुरक्षित अन् आनंदात रहायला भूमी दिली तुम्ही ।
भाग्यवान आहोत जगभरातील साधक आम्ही ।। ४ ।।
कर्नाटकातील ‘हिंदु राष्ट्रा’चा आधारस्तंभ असणारी भूमी दिली तुम्ही ।
या भूमीत निर्माण करावे ‘अध्यात्म विश्वविद्यालय’ आमच्याकडून तुम्ही ।। ५ ।।
सर्वकाही करून म्हणता ‘भूमी मिळवण्यासाठी छान प्रयत्न केले तुम्ही’ ।
सगळे करूनही नामानिराळे रहाणारे ब्रह्मांडनायक आहात तुम्ही ।। ६ ।।
तुमचे गुणगान करण्या असमर्थ आहोत आम्ही ।
अवतारी गुरूंच्या चरणी कृतज्ञतापुष्प वाहतो आम्ही ।। ७ ।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
– आपली चरणसेविका,
पूर्णिमा प्रभु (वय ६३ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (१३.१२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |