१. मोठ्या वाईट शक्तीने प्लास्टिकच्या पिशवीवर त्रासदायक चेहरा उमटवण्याच्या माध्यमातून त्रास देणे
१ अ. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश प्लास्टिकच्या पिशवीवर पडून त्या ठिकाणी मोठ्या वाईट शक्तीच्या चेहर्याची आकृती उमटणे : ‘१८.११.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात असतांना मला तीव्र आध्यात्मिक त्रास होत होता. १९.११.२०२२ या दिवशी सकाळी उठल्यापासून माझी प्राणशक्ती अल्प होती आणि मला ग्लानी येण्याचे प्रमाणही वाढले होते. मी पलंगावर बसून उपायांसाठी मला सांगितलेला नामजप करत होते. मी ज्या पलंगावर झोपले होते, त्याच्या समोरच असलेल्या कपाटाच्या हँडलला एक प्लास्टिकची पिशवी अडकवली होती. मी समोरील कपाटाच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीकडे पाहिले. त्या वेळी खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश त्या पिशवीच्या एका भागावर पडून त्या ठिकाणी मोठ्या वाईट शक्तीच्या चेहर्याची आकृती उमटली होती.
१ आ. मोठ्या वाईट शक्तीच्या चेहर्याचे वर्णन : मोठ्या वाईट शक्तीच्या डोक्यावर पुष्कळ उंच टोपी होती. पिशवीवर इंग्रजीमध्ये ‘ग्रोथ’ (GROWTH) असे लिहिलेल्या ठिकाणी त्याची टोपी दिसत होती. जेथे इंग्रजीतील अक्षरे संपली, तेथे तिची टोपी संपली होती. इंग्रजी अक्षरांच्या खाली तिच्या कपाळाला आरंभ झाला होता. त्या खाली तिचे दोन्ही डोळे दिसत होते. ‘ती अतिशय भेदक दृष्टीने आपण मान वळवू, त्या दिशेने आपल्याकडे पहात आहे’, असे माझ्या लक्षात आले. तिच्या डोळ्यांत पुष्कळ क्रूरता भरलेली दिसत होती. तिचे नाक तिरके होते आणि ओठांचा भाग सुजल्याप्रमाणे वाटत होता. तिच्या चेहर्यावर पुष्कळ सुरकुत्या दिसत होत्या. तिला उजवा कान नव्हता आणि डावा कान डोळ्यांच्या सरळ रेषेत होता. त्या मोठ्या वाईट शक्तीला दाढीही होती.
१ इ. मोठ्या वाईट शक्तीने पिशवीला माध्यम बनवून पिशवीवर तिचा चेहरा उमटवणे आणि त्याच्याकडे पाहून पुष्कळ त्रास होणे : प्रत्यक्षात त्या पिशवीवर कोणत्याही प्रकारची नक्षी नव्हती. केवळ प्लेन बॅकग्राऊंडवर (पार्श्वभूमीवर) इंग्रजी अक्षरांमध्ये ‘ग्रोथ’ (GROWTH) असे लिहिले होते. ‘मोठ्या वाईट शक्तीने मला त्रास देण्यासाठी त्या पिशवीला माध्यम बनवून प्रकाशकिरण परावर्तित होणार्या ठिकाणी वाईट शक्तीचा चेहरा उमटवला’, असे माझ्या लक्षात आले. त्या चेहर्याकडे पाहून मला पुष्कळ त्रास होत होता.
२. एकदा एक फळ खाऊन झाल्यानंतर माझा उष्टा हात चुकून भिंतीला लागला. तेव्हा ‘काटेरी डोके असलेल्या मोठ्या वाईट शक्तीचा चेहरा भिंतीवर उमटला आहे’, असे थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले.
३. काही वेळा हस्तप्रक्षालनपात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी असलेल्या आरशातही अशा प्रकारचे त्रासदायक चेहरे उमटलेले आढळतात.’
– (पू.) सौ. अश्विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०२३)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |