‘मला ‘आपत्काळात माझी मुलगी (सौ. प्रतिभा जयंत पाखरे) आणि माझा भाऊ (श्री. राजाराम मस्तूद) या दोघांचे कसे होईल ?’, अशी काळजी वाटत असे. मी त्यांना ‘मुंबई सोडून माझ्याजवळ फोंडा, गोवा येथे रहायला या’, असा सतत आग्रह करत असे.
१. सत्संगातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे आश्वस्त करणारे बोलणे ऐकून साधिकेच्या मनातील तिची मुलगी आणि तिचा भाऊ यांच्याबद्दलचे काळजीचे विचार दूर होणे
एकदा एका सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मला म्हणाले, ‘‘तुम्हाला नातेवाइकांची काळजी वाटते. मला तर सर्व जगाची काळजी वाटते.’’ गुरुदेवांनी असे सांगितल्यावर त्या दिवसापासून माझ्या मनातील माझी मुलगी आणि भाऊ यांच्याबद्दलचे काळजीचे विचार दूर झाले. मला वाटले, ‘गुरुदेवांना जगाची काळजी वाटते, म्हणजे माझे नातेवाइकही त्यातच येतात. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांचीसुद्धा काळजी घेणारच आहेत.’ तेव्हापासून माझ्या मनात गुरुदेवांविषयी अपार कृतज्ञता दाटून येत आहे.
२. साधिकेची सून साधिका आणि तिचे यजमान यांची मुलीप्रमाणे काळजी घेत असणे
माझी तिन्ही मुले (सौ. प्रतिभा जयंत पाखरे, श्री. रमेश शिंदे आणि श्री. अविनाश शिंदे) आमच्यापासून दूर रहातात. श्री. रमेश सेवेनिमित्त बाहेरगावी असतो. श्री. अविनाश नोकरीनिमित्त पनवेल, नवी मुंबई येथे असतो. माझी सून सौ. जान्हवी रमेश शिंदे ही मुलीप्रमाणे आमची (मी आणि माझे यजमान श्री. हनुमंत शिंदे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८२ वर्षे) काळजी घेते. ती आमच्या आजारपणात औषधोपचार मनापासून आणि तत्परतेने करते. ती आमची सेवा मनोभावे करते.
३. मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधकांबद्दल अपार कृतज्ञता वाटते. ते साधक दिवसभर अथक सेवा करून साधकांना वेळेत प्रसाद आणि महाप्रसाद देतात.
हे गुरुदेवा, तुम्ही माझ्यावर करत असलेल्या या कृपेबद्दल आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– सौ. कमल हनुमंत शिंदे (वय ७० वर्षे), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |