अंत्यज आणि जात्यंध या शब्दांचे खरे अर्थ

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

‘अंत्यज’ या शब्दाचा अर्थ शेवटी जन्मलेला किंवा लहान भाऊ असा आहे. दलित वा मागासवर्गीय असा कोणताही शब्द संस्कृत भाषेत अथवा शास्त्रकारांनी दिलेला नाही. कोणत्याही धर्मग्रंथात नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ मंडळींनी ‘अंत्यज’ असाच शब्द धाकट्या भावासाठी योजावा. अंत्यज – अंत्य म्हणजे लहान धाकटा, ज म्हणजे जन्मलेला ! चुकीच्या संज्ञा वा चुकीचे शब्द आपण पसरवू नये, तसेच साम्यवादी लोक ‘जातीयवादी’ या शब्दाऐवजी मुद्दाम ‘जात्यंध’ असा शब्द वापरतात; पण जात्यंध म्हणजे जन्मतः अंध ! तेव्हा चुकीच्या संज्ञा वापरू नये.

– वेदमूर्ती भूषण जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग.