उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे एका सरकारी कर्मचार्याने ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सरकारच्या शिक्षण विभागाच्या ग्रंथालयातील वरिष्ठ साहाय्यक आसिफ हसन याने हिंदु विद्यार्थिनींचे ‘ब्रेनवॉश’ (चुकीचे प्रबोधन) केले. तो हिंदु विद्यार्थिनींना मुसलमान तरुणांशी बोलण्यासाठी प्रोत्साहित करायचा, तसेच इस्लामविषयी त्यांना माहिती सांगत असे. सहा महिने हा प्रकार चालू होता ज्या अंतर्गत बाहेरील मुसलमान तरुणही या ग्रंथालयाला भेट देत होते. यातून हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या कचाट्यात अडकवण्याचे मुसलमानांचे पद्धतशीर प्रयत्न कशा प्रकारे चालतात, हेच स्पष्ट होते.
आसिफ हसन हा याआधी अनेकदा वादात सापडला होता. १३-१४ वर्षांपूर्वी हसनच्या खोलीत काही शस्त्रे सापडली होती. केवळ हा आसिफच नाही तर मेंदी काढणारे, केसांच्या रचना करणारे, साड्या नेसवणारे, कपडे शिवणारे, दुचाकी शिकवणारे, नृत्य शिकवणारे, योग शिकवणारे असे विविध ‘आसिफ’ मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवत आहेत. लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमान तरुणांना आतंकवादी वा मुसलमान धार्मिक नेते आर्थिक साहाय्य आणि भेटवस्तू पुरवून प्रशिक्षण देतात अन् हिंदु तरुण मुलींना फसवल्यास त्यांना मोठी रक्कम देतात. यासाठी मुसलमान तरुणांना पाकमधून पैसा, गाडी आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. या जिहादसाठी सौदी अरेबियातील जेद्दा येथील ‘इंडियन फ्रॅटर्निटी फोरम’ ही संस्था पैसे जमा करून ते इस्लामी धर्मादाय संस्थांच्या माध्यमांतून भारतात पाठवते. ही संस्था शिष्यवृत्तींच्या नावाखाली मुसलमान युवकांना ‘लव्ह जिहाद’ करण्यासाठी निधी उपलब्ध करून देते. मुर्शिदाबाद येथे ‘रिसाब’ ही संघटना ‘लव्ह जिहाद’साठी निधी पुरवणारी आणि त्याला पाठिंबा देणारी संघटना आहे.
लोकसंख्येत पालट करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवणे हा ‘लव्ह जिहाद’चा मुख्य उद्देश आहे. ‘लव्ह जिहाद’च्या घटना परदेशी अर्थपुरवठ्यामुळे घडत आहेत’, असे बरेली येथील जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश रवि कुमार यांनी एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सांगितले. वैद्यकीय क्षेत्र, न्यायदान करणारी महिला, आय.ए.एस्.ची सिद्धता करणारी तरुणी अशा सर्वच क्षेत्रांतील मुलीही फसत चालल्याने हे गंभीर आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे आवश्यक आहे. लव्ह जिहादचे संकट तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. १० टक्के धर्मांतरित युवतींना आतंकवादी बनवले जाते. एखादा मुसलमान तरुणीच्या संपर्कात येत आहे, असे कळल्यावर इतरांच्या साहाय्याने हे षड्यंत्र हाणून पाडायला हवे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे