खलिस्तान्यांना संरक्षण, तर हिंदूंना लाठ्यांनी मारहाण
व्हिक्टोरिया ( ब्रिटीश कोलंबिया) – कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील एका हिंदु मंदिराच्या परिसरात ‘रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलीस’ (आर्.सी.एम्.पी.) या संघटनेच्या पोलीस अधिकार्यांनी हिंदु भाविकांवर आक्रमण केले. मंदिराच्या परिसरात दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या हिंदु भाविकांवर आक्रमण करण्यासाठी आलेल्या खलिस्तान्यांना संरक्षण पुरवण्यासह या पोलिसांनी हिंदूंना धक्काबुक्की आणि लाठ्यांनी मारहाण केली. यासह पोलिसांनी तेथील ३ हिंदु भाविकांना कोणत्याही आरोपाविना कह्यात घेतले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
The British Columbia police attack Hindu devotees in Canada!
On one side the protect the Khalistanis and on the other they beat the Hindus with sticks
Will the Indian Government take the Canadian Government to task for this unreasonable act?#CanadianTerrorists… pic.twitter.com/KPC74Q1UDp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 4, 2024
मंदिराच्या प्रवक्त्याने हिंदु भाविकांच्या अटकेविषयी चिंता व्यक्त केली. ‘आम्ही पोलीस अधिकार्यांकडून अधिक माहितीची वाट पहात असल्याने हिंदु समुदायाने धीर धरावा’, असे प्रवक्त्याने म्हटले आहे. अन्वेषणाचा एक भाग म्हणून ही अटक करण्यात आली आहे, असे ‘आर्.सी.एम्.पी.’ने सांगितले.
संपादकीय भूमिकायाविषयी भारत सरकार कॅनडा सरकारला खडसवेल का ? |