यवतमाळ – येथील वणी पोलीस ठाण्यातील कार्यरत महिला पोलीस कर्मचार्यासह पोलीस शिपायाचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. दुचाकी वाहनावरील दंडाची रक्कम स्वतःच्या भ्रमणभाषवर ऑनलाईन घेतल्याचा ठपका महिला कर्मचार्यांवर आहे, तर मटका जुगार व्यवसायिकांसमवेत संबंध ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले. स्वाती कुटे आणि सागर सिडाम अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका :पोलीसच गुन्हे करत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ? |