१ अ. आनंद आणि उत्साह जाणवणे, तसेच ‘शरिराभोवती देवीचे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे जाणवणे : ‘७.१०.२०२१ या दिवशी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री दुर्गादेव्यै नम:।’ हा नामजप लावल्यावर मला आनंद आणि उत्साह जाणवत होता. मला आलेली मरगळ निघून गेली. मला माझ्या ‘शरिराभोवती देवीचे संरक्षककवच’ जाणवत होते. ही अनुभूती लिहितांना मी लिहीत असलेल्या कागदावर पांढरा प्रकाश पडला होता.
२. त्रासदायक अनुभूती
२ अ. शारीरिक त्रास होणे : सायंकाळी श्री दुर्गादेवीचा नामजप लावल्यावर तो ऐकतांना माझे डोके जड झाले. मला काही सुचत नव्हते. माझे शरीर जड झाले. ‘माझ्या पायाखालील भूमी हलत आहे’, असे मला वाटत होते आणि माझ्या डाव्या पायात गोळा आला.
२ आ. शारीरिक त्रासात वाढ होणे : ९.१०.२०२१ या दिवशी नामजप ऐकतांना माझ्या शरिरात उष्णता निर्माण झाली. माझ्या आध्यात्मिक त्रासांत वाढ झाली. ‘नामजप ऐकू नये’, असे मला वाटले.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक