Donald Trump accuses India : भारताकडून व्यापारी संबंधात गैरवर्तवणूक होत आहे ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

डावीकडून डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान मोदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताची धोरणे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधात अडसर ठरत असून भारताकडून गैरवर्तणूक होत आहे, असा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्राध्यपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ‘पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या विषयावर चर्चा करीन’, असेही ते म्हणाले. ही भेट कुठे होणार आहे ?, याविषयी मात्र त्यांनी काहीही ठोस माहिती दिली नाही.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २१ सप्टेंबर या दिवशी ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित करणार आहेत. आशिया खंडात चीनचा प्रभाव मोडीत काढून भारत स्वतःचे स्थान निर्माण करत आहे, अशी भावना अमेरिकेतील तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.

संपादकीय भूमिका

अमेरिकेचा कोणताही नेता कधीही भारताचा विश्‍वासू असू शकत नाही, हे भारतियांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !