१. चिपळूण येथे झालेल्या अभ्यासवर्गात श्री. प्रकाश जोशी यांच्याशी प्रथम भेट होणे
‘१.५.१९९४ या दिवशी श्री. काणे यांचे आदर्श सभागृह, चिंचनाका, चिपळूण येथे ‘अध्यात्म’ या विषयावर अभ्यासवर्ग होता. तेव्हा माझे मित्र श्री. संजय अभ्यंकर यांनी मला त्या अभ्यासवर्गात यायला सांगितले. मी सकाळी १० वाजता अभ्यासवर्गाला गेलो. तेथे माझी प्रथम श्री. प्रकाश जोशी यांच्याशी भेट झाली. अभ्यासवर्ग झाल्यानंतर उपस्थितांचे शंकानिरसन झाले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली प्रथम भेट
नंतर श्री. जोशी म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) अभ्यासवर्ग ७.५.१९९४ या दिवशी सावंतवाडी येथील प.पू. भाऊ मसुरकर यांच्या सभागृहामध्ये आहे. प.पू. गुरुदेव ६.५.१९९४ या दिवशी सावंतवाडी येथे येणार आहेत. आपण त्याही अभ्यासवर्गात येऊ शकता.’’ मी ६.५.१९९४ या दिवशी सावंतवाडी येथे गेलो. श्री. प्रकाश जोशी यांनी प.पू. गुरुदेवांशी माझी भेट घडवून आणली.
३. श्री. प्रकाश जोशी यांची अध्यात्मप्रचार करण्याची तळमळ आणि त्यांची गुरूंप्रती श्रद्धा पाहून सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होणे
श्री. प्रकाश जोशी यांची अध्यात्मप्रचार करण्याची तळमळ आणि त्यांची श्री गुरुंप्रती श्रद्धा पाहून मी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी झालो. त्यानंतर श्री. जोशी यांच्या समवेत मला अध्यात्मप्रचाराच्या सेवेसाठी विदर्भात जाण्याची संधी मिळाली. श्री. जोशी यांच्यामधील ‘नियोजनकौशल्य, दूरदृष्टी, सर्वसमावेशकता आणि गुरूंप्रती दृढ श्रद्धा’ आदी गुणांमुळे श्री. प्रकाश जोशी आमच्या जीवनात आदर्शवत् आहेत.
गुरुचरणी शरणागतभावाने कृतज्ञता !’
– श्री. उदय तुळाजी केळुसकर (वय ६६ वर्षे), लांजा, जिल्हा रत्नागिरी. (१३.३.२०२४)