दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘आदर्श वडील’ या मथळ्याखाली आलेले लिखाण वाचून नातेवाइकांचा साधनेला असलेला विरोध दूर होणे

सौ. सारिका आय्या

‘२९.८.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आदर्श वडील’ या मथळ्याखाली माझे वडील श्री. सुरेश काशेट्टीवार यांचे मी दिलेले लिखाण प्रसिद्ध झाले होते. वडिलांनी मला, माझे यजमान (श्री. कृष्णा आय्या) आणि मुलगा (कु. विश्व कृष्णा आय्या) यांना आश्रमात राहून साधना करण्यासाठी कसा पाठिंबा दिला अन् आमच्या साधनेला विरोध करणार्‍या एका नातेवाईकाला त्यांनी खंबीरपणे कसे उत्तर दिले’, याविषयीचे हे लिखाण होते. हे लिखाण मी आमचे नातेवाईक आणि माझ्या मैत्रिणी यांच्या ‘व्हॉट्स ॲप’वरील गटांत टाकले.

श्री. सुरेश काशेट्टीवार

१. ते लिखाण वाचल्यावर ज्या नातेवाइकांचा साधनेला थोडा फार विरोध होता, तो विरोध दूर झाला.

२. नातेवाईक आणि मैत्रिणी यांनी मला संपर्क करून विचारले, ‘तू आश्रमात राहून साधना करतेस, म्हणजे काय करतेस ?’

३. काही नातेवाइकांनी साधना करण्याच्या माझ्या निर्णयाचे कौतुकही केले.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच कृपेमुळे या लिखाणाच्या माध्यमातून आमच्या नातेवाइकांचा विरोध दूर होऊन त्यांना ‘साधना म्हणजे काय ?’, हे विचारण्याची बुद्धी झाली. यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.