‘२१.९.२०२३ या दिवशी गौरी आवाहनाच्या पूजेची सिद्धता करत असतांना माझ्याकडून गौराईला नकळत प्रार्थना झाली, ‘हे गौराई माते, मला काही येत नाही. तूच माझ्याकडून तुझी पूजा सेवा म्हणून करून घे.’ त्यानंतर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. गौराईंना घरात घेत असतांना कुंकवाची लहान पावले घरात उमटली.
२. गौराईंना साडी नेसवत असतांना ‘देवी श्वास घेत आहे’, असे मला वाटले.
३. गौराईंना साडी नेसवत असतांना ‘मी सद्गुरु स्वाती खाडये यांना साडी नेसवत आहे’, असे जाणवले आणि माझा भाव पुष्कळ जागृत झाला.
४. गौरी आवाहनाच्या काही दिवसांपूर्वी माझा पाय मुरगळला असल्याने दुखत होता; परंतु देवी आवाहनाची पूर्व सिद्धता करतांना, तसेच गौरी आवाहन करतांना पायाच्या दुखण्याविषयी मी पूर्णपणे विसरले. तेव्हापासून माझे पायाचे दुखणे अल्प झाले.’
– सौ. भक्ती डाफळे, सातारा (२५.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |