हिंदुविरोधी काँग्रेसची पापे !

भारत देश आणि हिंदु धर्म यांच्या नाशासाठी कार्यरत असलेल्या काँग्रेसला राष्ट्र अन् धर्म प्रेमींनी कायमचे घरी बसवायला हवे !

१. अल्पसंख्यांकधार्जिण्या धोरणांना पाठबळ

मी काँग्रेस आहे. मी हिंदूंसाठी मृत्यूची घंटा आहे. २१ सहस्र हिंदूंना ठार मारूनही मी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये (आताचे ५ सहस्र १५ कोटी रुपयांहून अधिक) दिले. जरी धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली, तरी मी ३ कोटी ५० सहस्र मुसलमानांना भारतात ठेवण्याविषयी आग्रह धरला. मी ‘हिंदुमुक्त काश्मीर’ची निर्मिती केली. मी राज्यघटनेमध्ये नंतर ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्द घातला. भारतातील ९ राज्यांमध्ये (काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप) हिंदु अल्पसंख्यांक होतील, याची निश्चिती मी केली. मी ‘हिंदू कोड विधेयक’ सिद्ध केले, ज्याला सरदार वल्लभभाई पटेल यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर केवळ हिंदूंवर निर्बंध घालण्यासाठी हे विधेयक संमत केले. भारतीय नागरी संहितेने विरोध करूनही मी ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ सिद्ध केला आणि मुसलमानांना त्यांच्या पवित्र पुस्तकाप्रमाणे त्यांचा धर्म अनुसरण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले. मी ‘अलीगढ मुस्लीम विश्वविद्यालय’ या नावामध्ये ‘मुस्लीम’ हा शब्द घातला; परंतु ‘बनारस हिंदु विश्वविद्यालय’ नावामधील ‘हिंदु’ या शब्दाला विरोध केला.

२. राष्ट्र आणि हिंदु धर्म विरोधी केलेल्या कारवाया

मी राज्यघटनेमध्ये कलम ३५(अ) आणि कलम ३७० (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारी कलमे) यांचा समावेश करून काश्मीरची समस्या आणखी गुंतागुंतीची केली. मी केवळ आमच्या शूर सैनिकांनी जिंकलेला पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानला परत दिला नाही, तर पाकिस्तानच्या कारागृहात अडकलेल्या भारताच्या ५४ शूर सैनिकांची पर्वा न करता भारताच्या कह्यात असलेले पाकिस्तानचे ९३ सहस्र सैनिक त्यांना परत दिले. त्यांच्या नशिबाने आजही भारतीय सैनिकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. मी कैलास मानसरोवराची ९० सहस्र चौरस किलोमीटर भूमी चीनला दिली आणि ‘ही दिलेली भूमी ओसाड होती अन् तिचा काहीही उपयोग नव्हता’, असे विधान निर्ल्लजपणे लोकसभेत केले. या भूमीच्या परिसरात असलेल्या भारतीय भूमीमध्ये जगातील सर्वांत मोठा ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्याची कल्पना आज भारत करत आहे.

मी रोहिंग्या मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये आणून वसवले आणि माझी मतपेढी वाढवण्यासाठी बांगलादेशी मुसलमानांना भारतात घुसखोरी करू दिली. मी नागरिकांची नोंदणी की, जी जगातील सर्वांत लहान असलेल्या राष्ट्रातही आहे, अशा ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिये’ला (‘एन्.आर्.सी.’ला) विरोध केला; कारण त्यामुळे अवैधपणे स्थलांतर केलेल्या लोकांची माझी मतपेढी तशीच राहील. मी ३ सहस्रांहून अधिक शिखांची हत्या केली. मी दूरदर्शनवरील ‘सत्यं शिवं सुन्दरम्’ हे बोधचिन्ह हटवले. मी केंद्रीय नवोदय विद्यालयाकडून दाखवली जाणारी ‘असतो मा सद्गमय’ ही ओळ हटवली. मी ‘वन्दे मातरम’ हे राष्ट्रगीत असावे, याचा विरोध केला. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या ‘भारतावरील आक्रमणाच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे’, असे सांगून मी रा.स्व. संघाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. यादृष्टीने कसाब आणि इतर आतंकवादी यांच्या मनगटावर लाल धागा बांधण्यात आला होता. त्यांना जर जिवंत पकडले नसते, तर माझे नियोजन यशस्वी झाले असते. माझे स्वतःचे अधिवक्ते हे आतंकवादी, देशाचे तुकडे करू पहाणारी टोळी आणि नक्षलवादी यांचे खटले लढवत आहेत.

३. हिंदु धर्म, देवता, पवित्रके आणि सैन्याधिकारी यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाया

मी देशात आणीबाणी घोषित करून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ या घोषणा देण्याच्या विरुद्ध मी आहे. वर्ष १९६६ मध्ये पवित्र गायींसाठी आंदोलन करणार्‍या शेकडो साधूंना मी ठार केले. मी हज यात्रेसाठी अनुदान दिले आणि अमरनाथ यात्रेवर कर बसवला. मी सरदार पटेल यांना सोमनाथ मंदिर बांधण्यासाठी विरोध केला. सोमनाथ मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी जाणारे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना मी विरोध केला आणि त्यांना निवृत्तीनंतर कधीच सरकारी लाभ मिळणार नाहीत, याची निश्चिती केली. मी नेहमीच रा.स्व. संघाला ‘आतंकवादी संघटना’ म्हणतो; परंतु मला मुसलमानांशी बंधुत्व आवडते. ‘श्रीराम हा काल्पनिक आहे’, असे प्रतिज्ञापत्र मी न्यायालयात दिले आणि ‘रामसेतू’ तोडण्याचा मी प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रांनी भारताला दिलेला ‘व्हेटो अधिकार’ (नकाराधिकार) मी चीनला दिला. युद्धातील महान व्यक्ती सॅम माणेकशॉ यांनी इंदिरा गांधी यांना दुखावल्याने ‘मी त्यांना ३० वर्षांहून अधिक काळ त्यांचे वेतन मिळणार नाही’, याची निश्चिती केली; परंतु रुग्णालयात त्यांची राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भेट घेतल्यानंतर त्यांना १ कोटी २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

४. हिंदूंचा नाश होण्यासाठी प्रयत्नरत…

मी विसरण्याआधी सांगतो की, ‘माझ्या सर्व संस्थांकडून प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार करून मी देशाला रक्तबंबाळ केले आहे’, असे आरोप माझ्यावर आहेत. ‘मूर्ख ‘सेक्युलर’ हिंदु मला सत्तेमध्ये येण्यास पुन्हा एकदा संधी देतील’, याची मी वाट पहात आहे. जेव्हा मी सत्तेवर येईन, तेव्हा हिंदूंचा पूर्णपणे नाश होईल, याची मी खात्री करीन.

(साभार : विविध संकेतस्थळे)