|
नवी मुंबई – पोलीस आयुक्तालयातून गेल्या ७ महिन्यांत १९५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे गुन्हे नोंद झाले असून त्यांपैकी १७२ मुलींचा शोध लागला आहे. २२ मुली अद्याप बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमीष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या घटना सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणांमध्ये १९ गुन्हे पोक्सोअंतर्गत वर्ग करण्यात आले आहेत. नवी मुंबईत दीड वर्षांच्या कालावधीत सुमारे ६०० अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद झाली. यात मुलींची संख्या ४०० पेक्षा अधिक आहे. यातील ५६० मुलामुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, तसेच स्थानिक पोलिसांना यश आले आहे.
३४ गुन्ह्यांतील मुला-मुलींचा शोध लागला नसून त्यामध्ये मुलींची संख्या २२ आहे. अपहरण झालेल्या मुलांना समुपदेशनाची आवश्यकता असली तरी तशी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे या मुला-मुलींना समुपदेशन करण्याचे कामही पोलिसांना करावे लागते.
संपादकीय भूमिका‘स्मार्ट सिटी’ पेक्षा ‘सुरक्षित शहर’ हवे ! |