|
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ संघटनेने अवैधपणे मदरसा उभारला आहे. या ठिकाणी वीज आणि पाणी यांची जोडणी असून कूपनलिकाही खोदण्यात आली आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून या अवैध मदरशावर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश द्यावा, या मागणीचे निवेदन हुपरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे यांनी २२ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना ते कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी आले असतांना दिले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन तहसीलदार सैपन नदाफ यांनी स्वीकारले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. ऋषिकेश साळी आणि श्री. ऋषिकेश दिवाण उपस्थित होते.
Take action against the illegal Madrasa in Hupari (#Kolhapur District) – Hindu activist Nitin Kakde writes petition to the Chief Minister
The unauthorised Madrasa has been set up by the ‘Muslim Sunnat Jamiat’
Despite numerous complaints, no action has been taken.
No action… pic.twitter.com/FXoOKU4XEC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 23, 2024
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही कारवाई नाही !या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी २ ऑगस्ट २०२४ या दिवशी हुपरीच्या मुख्याधिकार्यांना ‘श्री. नितीन काकडे यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करा’, असे लेखी पत्र दिलेले असतांनाही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (जिल्हाधिकार्यांचाही आदेश धुडकावणारे अधिकारी जनतेशी कसे वागत असतील ?, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) तरी या संदर्भात तात्काळ कार्यवाही होण्याचा आदेश प्रशासनाला द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. |
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. सदर अतिक्रमण आणि अवैध मदरसा बांधकामाच्या विरोधात यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या; मात्र त्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात हुपरीचे मुख्याधिकारी यांनी ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ यांच्याकडे खुलासा मागितला; मात्र ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ने तो केलेला नाही.
२. या संदर्भात मुस्लिम सुन्नत जमियतने इचलकरंजी येथील न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेला दावा न्यायालयाने ४ एप्रिल २०१९ या दिवशी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तरी या जागेच्या संदर्भात सध्या कोणताही दावा किंवा वाद न्यायप्रविष्ट नसून सदरचे अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात न्यायालयाचा कोणताही मनाई आदेश नाही अथवा स्थगितीचाही आदेश नाही.
या प्रसंगी तेथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी उपस्थित होते. त्यांनी या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने यांना या संदर्भात तात्काळ लक्ष घालण्याची सूचना केली. यानंतर श्री. नितीन काकडे यांनी २३ ऑगस्टला खासदार श्री. धैर्यशील माने यांची स्वतंत्ररित्या भेट घेतली. सर्व प्रकरण समजून घेतल्यावर श्री. माने यांनी ‘या संदर्भात पाठपुरावा करून कारवाई होण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन दिले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. ऋषिकेश साळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महादेव आढावकर आणि श्री. सचिन माळी उपस्थित होते. |
३. शासकीय गायरान भूमीवर असलेली अतिक्रमणे तातडीने हटवावीत, असा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे.
४. या अवैध मदरशाला हुपरी नगर परिषदेकडून वीज आणि पाणी पुरवठा केला जात आहे. या संदर्भात तक्रार नोंदवूनही कार्यवाही झालेली नाही.
संपादकीय भूमिका
|