अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या ‘अर्बन (शहरी) नक्षलवादा’ला पाठिंबा देणार्‍यांच्या विरोधात पुणे येथे हिंदुत्‍वनिष्‍ठांची मूकनिदर्शने !

भर पावसात आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु संत, भाविक यांना ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाले भोंदू ठरवून त्‍यांची समाजात अपकीर्ती करत आहेत. खरे तर यांच्‍या स्वत:च्‍या ट्रस्‍टमध्‍ये केलेल्‍या कोट्यवधींच्‍या घोटाळ्‍याची चौकशी चालू आहे. अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी म्‍हणून पकडले गेले आहेत; एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्‍यांच्‍या विरोधात समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने पुणे येथे मूकनिर्दशने करण्‍यात आली. या वेळी पुष्कळ पाऊस असतांनाही मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हातात ‘भावी पिढीला नास्तिक आणि राष्ट्रविरोधी बनवू पहाणार्‍या ‘कम्युनिस्‍ट इकोसिस्टीम’च्‍या विरोधात कृतीशील व्‍हा !’, ‘नक्षलवादाशी संबंध असल्‍यामुळे अंनिसच्‍या लोकांना अटक का होते ?’, ‘छुपा नक्षलवाद म्‍हणजे देशद्रोह्यांना उमेदवारी आणि फुटीरतावाद्यांचा सन्‍मान’, ‘राष्‍ट्रप्रेमी भारतियांनो, कम्‍युनिस्‍ट, सेक्युलर आणि जिहादी यांच्‍या राष्‍ट्रघातकी युतीविरुद्ध संघटित व्‍हा !’, असे विविध फलक घेऊन हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

या वेळी श्री. पराग गोखले म्‍हणाले की, वर्ष २०११ मध्‍ये गृह विभागाने दिलेल्या नक्षलवाद्यांना साहाय्‍य करणार्‍या संस्‍थांच्‍या सूचीत अंनिसचे नाव होते. त्यांच्‍या कार्यकर्त्यांना नक्षलवादी कारवायांतील सहभागासाठी अटक झाली होती. शाम मानव यांना खोटे लिखाण केल्‍याबद्दल त्‍यांना न्‍यायालयाने शिक्षा केली होती. ‘जे.एन्.यु.’मध्‍ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देण्‍याचा आरोप असणार्‍या कन्हैयाकुमार याला काँग्रेससारख्‍या राष्‍ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली. यातून पुरोगाम्‍यांची खरी भूमिका अर्बन नक्षलवादाला साहाय्‍यक आहे, हे लक्षात येते.