‘हरियाणा सरकारने राज्यातील शाळांमध्ये येत्या १५ ऑगस्टपासून ‘गुड मॉर्निंग’ असे बोलून अभिवादन करण्याचा इंग्रजी प्रघात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना किंवा शिक्षकांना अभिवादन करतांना ‘जय हिंद’ म्हणावे, असे या सरकारी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय ऐक्याविषयी आणि देशाच्या जाज्वल्य इतिहासाविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जोपासली जाईल, असे या पत्रकात म्हटले आहे.’ (१२.८.२०२४)