कुंभनगरीतील कामधेनू द्वाराखाली दुरूस्तीसाठी महर्षींच्या मूर्ती प्रशासनाने रस्त्यावर ठेवल्या !

महर्षींच्या रस्त्यावर ठेवलेल्या मूर्ती

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – कुंभनगरीतील सेक्टर ७ मधील ‘कलाकुंभ’च्या समोरील रस्त्यावरील ‘कामधेनूद्वार’ या स्वागत कमानीच्या दुरूस्तीसाठी महर्षींच्या मूर्ती रस्त्यावर ठेवल्याचे आढळले. या मूर्ती पूर्वी या कमानीवर विराजमान केल्या होत्या. आता कमानीच्या दुरुस्तीसाठी त्या रस्त्यावर खाली ठेवल्यामुळे महर्षींचा अवमान होत आहे, असे या परिसरातील भाविकांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला कळवले. प्रशासनाने या कमानीची दुरूस्ती होईपर्यंत या मूर्ती योग्य त्या ठिकाणी ठेवून आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. या कामधेनू द्वाराच्या शेजारी आणि कलाकुंभच्या समोर असलेल्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या प्रदर्शनाच्या स्वागतकमानीवर महर्षींचे चित्र कमानीच्या मध्यभागी, म्हणजे योग्य ठिकाणी लावल्याची प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत.