हेच आजचे रक्षाबंधन !

रक्षाबंधन

आज श्रावण शुद्ध पौर्णिमा ।
आगळा वेगळा शुभ दिन ।
हिंदु बंधूभगिनींचे रक्षाबंधन ।। १ ।।

श्री. दत्तात्रय पटवर्धन

निर्गुणातील तो परमेश्वर ।
सगुण माता-पिता गुरु ।
याच दैवतांना सदा स्मरू ।। २ ।।

देव, देश तथा स्वधर्म ।
याचसाठी असावे नित्य कर्म ।
असावे ते भावपूर्ण सत्कर्म ।। ३ ।।

घेऊ शपथ करू संकल्प ।
आणि करू भगिनी रक्षण ।
विशेषतः लव्ह जिहादपासून ।। ४ ।।

बंधूभगिनीचे पवित्र नाते ।
रेशमी धाग्यासम अतूट ते ।
तद्वत् मृदू मुलायम असते ।। ५ ।।

करतो परमेशा गुरूंना वंदन ।
सर्व भगिनींचे शुभचिंतन ।
हेच आजचे रक्षाबंधन ।। ६ ।।

– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७१ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग