हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी २२ जानेवारीला कुंभक्षेत्री पदयात्रेचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केले आयोजन !

प्रयागराज – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी कुंभक्षेत्री पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, धर्मप्रेमी, भाविक आदी सहभागी होणार आहेत. या पदयात्रेचा आरंभ कुंभक्षेत्रातील सेक्टर १९ मध्ये असलेल्या मोरी-मुक्ती मार्ग चौकातून दुपारी २.३० वाजता होणार आहे. या पदयात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.