‘पंचमहाभूते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञेत आहेत’, याची ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात आलेली प्रचीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘२४.६ ते ३०.६.२०२४ या काळात गोव्यामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पार पडला. त्यासाठी देश-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक हिंदुत्वनिष्ठ गोव्याला आले होते. ‘आपत्काळात पंचमहाभूते भक्तांचे रक्षण करतील’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले होते. ‘सर्व पंचमहाभूते गुरुदेवांच्या आज्ञेत आहेत’, याची प्रचीती या महोत्सवाच्या कालावधीत आम्ही सर्वांनी घेतली.

सौ. क्षिप्रा जुवेकर

जून मासात गोव्यात अतीवृष्टी होत असते आणि त्याच कालावधीत महोत्सवही असतो. गोव्यात दिवसरात्र पाऊस असतो; पण महोत्सवाला प्रारंभ झालेल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ‘वरुणदेवता गुरुदेवांच्या आज्ञेचे पालन करत आहे’, असे मला वाटले. सकाळी साडेआठ वाजता जेव्हा मान्यवर त्यांच्या निवास स्थानापासून रामनाथ देवस्थान येथील सभागृहाकडे यायचे, तेव्हा पाऊस थांबलेला असायचा. रात्री महाप्रसाद घेऊन जेव्हा मान्यवर निवासस्थानी परत जायचे, तेव्हाही पाऊस थांबलेला असायचा; मात्र एरव्ही दिवसरात्र पुष्कळ पाऊस पडायचा. असे लागोपाठ ८ दिवस मला अनुभवता आले. मान्यवरांनीही ही अनुभूती घेतली. ‘सर्वज्ञ’ आणि ‘सर्वशक्तीमान’ असलेल्या श्री गुरूंच्या चरणी कितीही वंदन किंवा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जळगाव, महाराष्ट्र. (४.७.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक