२९ जून ते १९ ऑगस्टपर्यंत चालणार यात्रा !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – यावर्षी २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यासाठीची नोंदणी १५ एप्रिलपासून प्रारंभ झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी श्राइन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येऊ शकते. त्याच वेळी, पंजाब नॅशनल बँक, एस्.बी.आय., येस बँक आणि जम्मू आणि काश्मीर बँक येथून ऑफलाईन नोंदणी केली जाऊ शकते. सरकारी नियमानुसार १३ ते ७० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक ही यात्रा करू शकतात. प्रवासासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया चालू आहे.
गेल्या वेळी सुमारे साडेचार लाख भाविक आले होते. या वेळी ६ लाख प्रवासी येण्याची शक्यता आहे. संपूर्ण मार्गावर भोजन, थांबा आणि आरोग्य तपासणी यांची व्यवस्था असेल. ऑक्सिजन बूथ, आयसीयू बेड, एक्स-रे, सोनोग्राफी मशीन आणि लिक्विड ऑक्सिजन प्लांट यांनी सुसज्ज असलेल्या २ कॅम्प रुग्णालयांची सिद्धता चालू आहे.