अमरनाथ यात्रेला आरंभ
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेत पवित्र गुहेतील बाबा बर्फानी या बर्फापासून नैसर्गिकरित्या निर्माण होणार्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यास २९ जूनपासून आरंभ झाला. बालताल आणि पहलगाम या यात्रा तळांवरून यात्रेकरूंचा पहिला गट पहाटे अमरनाथ गुहेकडे मार्गस्थ झाला. पहिल्या दिवशी एकूण ४ सहस्र ६०३ भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. ही यात्रा १९ ऑगस्ट या दिवशी संपणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी ३ लाख ५० सहस्रांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !