हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन
मुरुगुड (जिल्हा कोल्हापूर) – उरण येथील यशश्री शिंदे या हिंदु तरुणीची निर्घृण हत्या करणारा नराधम दाऊद शेख याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनास दिले. या प्रसंगी शिवभक्त सर्वश्री सर्जेराव भाट, संकेत भोसले, प्रकाश पारिशवाड, विक्रम गोधडे, तानाजी भराडे यांसह अन्य उपस्थित होते. घटनेची तीव्रता पहाता हिंदुत्वनिष्ठ भव्य मोर्चा काढणार होते; मात्र पोलिसांनी अनुमती नाकारल्याने केवळ निवेदन देण्यात आले.