सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘परात्पर गुरु’पदापर्यंतचा दैवी साधनाप्रवास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरविलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

‘लेखाच्या मागील भागात (भाग १ मध्ये) २१ जुलै २०२४ या दिवशी आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे बालपण, शालेय जीवन, वैद्यकीय शिक्षण, इंग्लडमधील वास्तव्य, जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ आणि संमोहन उपचार संशोधक म्हणून कार्यरत असणे ते ‘जिज्ञासू-साधक-शिष्य-संत (गुरु)-सद्गुरु’ पर्यंतचा साधनाप्रवास पाहिला. आता आपण त्यांचा ‘परात्पर गुरु’पदापर्यंचा दैवी साधनाप्रवास पाहूया.    

व्यक्तीची स्पंदने तिच्या छायाचित्रातही विद्यमान असतात. या तत्त्वानुसार परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांत त्यांची त्या त्या काळातील स्पंदने विद्यमान आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष १९९९ ते २०१३ (वय वर्षे ५७ ते ७१) या कालावधीतील त्यांच्या काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या.  या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत. (भाग २)

या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/816141.html

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांच्या लोलकाने मोजलेल्या नोंदी (वर्ष १९९९ ते २०१३)

टीप १ – या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे मोजतांना ती २३०० मीटरपेक्षाही अधिक होती; पण चाचणीस्थळी यापेक्षा अधिक जागा उपलब्ध नसल्याने ती पूर्ण मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.

टीप २ – हे छायाचित्र परात्पर गुरु डॉक्टर रुग्णाईत असतांनाचे आहे.

टीप ३ – हे छायाचित्र परात्पर गुरु डॉक्टर रुग्णाईत नसतांनाचे आहे.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

सौ. मधुरा कर्वे

२ अ. वर्ष १९९९ ते २००६ या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टरांमधील चैतन्याचे प्रमाण उत्तरोत्तर पुष्कळ वाढणे : वर्ष १९९९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. वर्ष २००० पासून सनातनच्या काही साधकांना आध्यात्मिक त्रास होण्यास आरंभ झाले. साधकांना होणारे त्रास दूर व्हावे यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी विविध ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ शोधून काढले. ते दिवस-रात्र तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी उपाय करत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी उपाय करणे’, हे ‘सूक्ष्मातील देवासुर लढा’ (टीप ४) आरंभ झाल्याचे दर्शक आहे. पुढे देवासुर लढ्याची तीव्रता वाढत गेली. तसे परात्पर गुरु डॉक्टरांमधील चैतन्याचे प्रमाणही उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढत गेले.

टीप ४ – सूक्ष्मातील देवासुर लढा : परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सनातनचे साधक समष्टी साधनेद्वारे भूतलावर ‘हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य)’ स्थापण्याच्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नरत आहेत, तर वाईट (आसुरी) शक्ती भूतलावर ‘आसुरी राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील आहेत. साधक त्यांच्या ध्येयापासून परावृत्त व्हावेत यासाठी भूत, पिशाच इत्यादी वाईट शक्ती त्यांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा विविध स्तरांवर त्रास देतात. साधकांचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्या व्यक्तींना वाईट शक्तींशी सूक्ष्म-स्तरावर (सूक्ष्मातून) युद्ध करावे लागते. नामजप करणे, प्रार्थना करणे, हातांच्या मुद्रा करणे आदी माध्यमांतून उन्नत हे युद्ध करतात.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांवर अनेकदा महामृत्यूयोगाचे संकट येणे, तसेच सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉक्टरांवर जीवघेणी आक्रमणे करणे : वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉक्टरांवर अनेकदा महामृत्यूयोगाचे संकट आले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी काही संतांनी अनुष्ठाने, तसेच काही आध्यात्मिक उपाय करण्यास सांगितले. त्यांनी सांगितलेले उपाय परात्पर गुरु डॉक्टरांनी अत्यंत भावपूर्ण केले आहेत आणि आजही करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे महान कार्य करत आहेत. या कार्यात विघ्ने आणण्यासाठी सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांवर जीवघेणी आक्रमणे करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. वर्ष २००९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर अत्यंत रुग्णाईत होते. तेव्हा त्यांच्या छायाचित्रात सकारात्मक ऊर्जेसमवेत नकारात्मक ऊर्जाही आढळून आली. यातून परात्पर गुरु डॉक्टरांवर होणार्‍या सूक्ष्मातील आक्रमणांची तीव्रता लक्षात येते.

२ इ. : वर्ष २०१० पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ होण्यास आरंभ होणे : वर्ष २०१० मध्ये ते ‘परात्पर गुरु’पदाला पोचले. वर्ष २०१० ते २०१३ मध्ये त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढत जाऊन ती १२५७ किलोमीटर झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातून परात्पर गुरु डॉक्टरांकडून किती मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे, हे लक्षात येते.

थोडक्यात वर्ष १९९९ ते २०१३ म्हणजे एकूण १४ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी केलेले अविरत प्रयत्न, तसेच सूक्ष्मातील बलाढ्य वाईट शक्तींशी केलेला घनघोर संग्राम याला तोड नाही. त्यांनी केलेल्या कठोर साधनेमुळे त्यांच्यातील चैतन्यात उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. यातून परात्पर गुरु डॉक्टरांचा साधनाप्रवास हा ‘दैवी साधनाप्रवास’ असल्याचे दिसून येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.७.२०२४)

या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/818806.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.