सर्व प्रमुख रुग्णालयांतील सुविधांचा आढावा घेणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

उदय सामंत

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णालये कार्यान्वित आहेत. तेथील जनरेटरची व्यवस्था, विविध आजारांचे निदान करणारी तपासणी यंत्रणा यांचा आढावा घेण्यात येईल. यामधे त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. भांडुप येथील ‘सुषमा स्वराज’ प्रसूतीगृहाविषयी विधानसभा सदस्य रमेश कोरगांवकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.