Delhi  Tanker Crushed Man : टँकरवर दगडफेक होत असतांना जीव वाचवण्‍याच्‍या प्रयत्नात चालकाने एक तरुणाला चिरडले !

  • राजधानी देहलीतील घटना !

  • आरिफ खान, शकील, सद्दाम आदींकडून चालू होती दगडफेक !

नवी देहली – राजधानी देहलीतील संगम विहार परिसरात काही दिवसांपूर्वी भर बाजारात झालेल्‍या हत्‍येच्‍या घटनेचा व्‍हिडिओ सध्‍या सर्वत्र प्रसारित झाला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये काही मुले पाण्‍याच्‍या टँकरवर दगडफेक करत असल्‍याचे दिसत आहे. शेवटी टँकरचा चालक स्‍वत:ला वाचवण्‍याच्‍या प्रयत्नात टँकर घेऊन जातांना एक तरुण चिरडल्‍याचे दिसत आहे. त्‍यानंतर चालक काही अंतरावर जाऊन टँकर सोडून जीव वाचवण्‍यासाठी घटनास्‍थळावरून पळून जात असल्‍याचेही व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे. टँकरच्‍या धडकेने गंभीर घायाळ झालेल्‍या तरुणाला रुग्‍णालयात नेले असता त्‍याचा मृत्‍यू झाला.

हा व्‍हिडिओ ३ जुलैचा असून पावसामुळे प्रतिवर्षी प्रमाणे देहलीतील संगम विहारसह अन्‍य भागांतही पाणी साचल्‍याचे दिसून आले. त्‍या वेळी या परिसरातील रतिया मार्गावर पाण्‍याचा एक टँकर भरधाव वेगाने गेला. तेथे उपस्‍थित १८ वर्षीय आरिफ खान उपाख्‍य विशू, १८ वर्षीय शकील आणि इतर लोक यांच्‍यावर रस्‍त्‍यावरील पाणी उडाले. संतप्‍त झालेल्‍या तरुणांनी टँकरला थांबवून त्‍यावर दगडफेक चालू केली. या वेळी स्‍वत:चा जीव वाचवण्‍याचा प्रयत्न करतांना चालक सपनसिंह याने टँकर चालवला, परंतु टँकरखाली सद्दाम हा तरुण चिरडला गेला. त्‍यामध्‍ये त्‍याचा रुग्‍णालयात उपचारांच्‍या वेळी मृत्‍य झाला. स्‍थानिक पोलीस ठाण्‍याने टँकरला ताब्‍यात घेतले असून या प्रकरणाचा तपास चालू केला आहे.

संपादकीय भूमिका

देशात अल्‍पसंख्‍य असणारे गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍य !