वर्साेवा येथील बंदराच्या ४९८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देऊ ! – सुधीर मुनगंटीवार, मत्स्य व्यवसाय मंत्री

मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र सागरी मंडळाने वर्साेवा येथे नवीन आधुनिक सोयी सुविधांयुक्त ‘फिशिंग हार्बर’चा (मासेमारी बंदराचा) प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनास पाठवला होता. तथापि केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे वर्साेवा येथील मत्स्यबंदर उभारणी संदर्भात केंद्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ४९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. ३ महिन्यांत त्याला मान्यता देऊ, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिले. सदस्य रमेशदादा पाटील यांनी हा प्रश्न विचारला होता.