Firhad Hakim : जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी असून त्यांना मुसलमान बनवून अल्लाला खुश करा ! – बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांचे मुसलमानांना आवाहन

बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम

कोलकाता (बंगाल) – जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. जर आपण त्यांना ‘दावत’ (इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण) देऊ शकलो आणि त्यांच्यात ‘इमान’ (इस्लामची भक्ती) आणू शकलो, तर आपण अल्लाला संतुष्ट करू शकू, असे विधान कोलकाता शहराचे महापौर तथा तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी ३ जुलै या दिवशी केले. या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. हकीम कोलकाता येथील धोनो धोन्यो स्टेडियमवर ‘ऑल इंडिया कुराण स्पर्धे’च्या कार्यक्रमात बोलत होते.

फिरहाद हकीम पुढे म्हणाले की,

१. जर आपण एखाद्याला इस्लामच्या मार्गावर आणू शकलो, तर इस्लामचा प्रसार करून आपण खरे मुसलमान असल्याचे सिद्ध होईल.

२. जेव्हा सहस्रो लोक डोक्यावर गोल टोप्या घालून बसतात, तेव्हा ते सर्वांना आपले दिसते. ही आपली एकता दर्शवते आणि हेदेखील स्पष्ट करते की, आपल्याला कुणीही दाबू शकत नाही.

३. आपण इस्लाममध्ये जन्मलो आहोत, त्यामुळे पैगंबर आणि अल्ला यांनी आपल्यासाठी स्वर्गाचा मार्ग मोकळा केला आहे. जर आपण कोणतेही पाप केले नाही, तर आपण थेट स्वर्गात जाऊ.

संपादकीय भूमिका

  • तृणमूल काँग्रेसचे मंत्री थेट अशा प्रकारचे विधान करतात आणि पक्षाच्या प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याविषयी काहीही बोलत नाहीत, यावरून तृणमूल काँग्रेस ही दुसरी मुस्लिम लिग असून लवकरच बंगालचे बांगलादेश झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • अशा पक्षाला बंगालमधील हिंदूच मते देऊन सत्तेवर बसवत आहेत आणि स्वतःचा आत्मघात करवून घेत आहेत !
  • मुसलमानेतरांना मुसलमान बनवण्यासाठी कोणते माध्यम वापरणार ?, हे हकीम यांनी स्पष्ट केलेले नसले, तरी १ सहस्र ४०० वर्षांचा इतिहास पाहिला किंवा वर्ष १९४७ च्या फाळणीच्या वेळेचा इतिहास पाहिला, तर ते माध्यम कुठले असेल ?, हे लक्षात येते !