
प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्था धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे, असे कौतुकोद्गार बीड येथील धर्मगुरु प.पू. श्री अमृताश्रम स्वामी यांनी केले. प.पू. स्वामीजींनी सनातनच्या वतीने सेक्टर क्रमांक १९ येथील मोरी मार्गावर लावण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
प.पू. स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘महाकुंभपर्वात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले सनातनचे ग्रंथप्रदर्शन सनातन धर्मीय लोकांनी येऊन अवश्य पहावे. भारतीय संस्कृती, संतांची परंपरा आदींविषयीची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. यासह तरुण वर्ग, महिला, विद्यार्थी यांनी धर्माचरण कसे करायला हवे ?, हेही या प्रदर्शनात पहाया मिळते. यातून सर्वानं शिकावे. सनातन संस्थेशी माझा पूर्वीपासून परिचय आहे आणि तो यापुढेही राहील. सनातन संस्था सनातन धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे. जे कार्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप या सर्वांनी केले, ते कार्य सनातन संस्था करत आहे. सनातनचे साधक उच्चशिक्षित असतांनाही ते स्वतःचा संसार, घर सोडून संन्याशाप्रमाणे सनातनसाठी अखंड त्याग करत आहेत. या साधकांना माझ्या शुभेच्छा आणि साधकांनी असेच कार्य करत रहाण्यासाठी ईश्वराने साधकांना आशीर्वाद द्यावा, अशी मी प्रार्थना करतो.