
प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – देशात धर्मांतर होण्याच्या घटना वाढत आहेत. लोकांना वीज, पाणी, भोजन आदी सुविधांची व्यवस्था सरकारने केली असती, तर लोकांनी धर्मांतर केले नसते. मनुष्याचा दृष्टीकोन संकुचित नको, तर व्यापक असायला हवा. सरकारने पाठ्यपुस्तकांत वैदिक संस्कृती आणि धर्म यांचे शिक्षण दिले, तर देशातील अनाचार नष्ट होईल, असे मार्गदर्शन मध् प्रदेशातील अन्नपूर जिल्ह्यातील अमरकंटक येथील पंचाअग्नीपिठाचे प.पू. अग्नीपिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर श्रीमद् रामकृष्णानंद महाराज यांनी केले.
प.पू. अग्नीपिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर श्रीमद् रामकृष्णानंद महाराज म्हणाले, ‘‘भगवान श्रीराम आमचे आदर्श आहेत. रामराज्याची कल्पना करायला हवी. सनातन धर्माच्या मार्गाने गेल्यावर जीवनाचे कल्याण होईल. महाकुंभपर्वात सनातनचे विराट दर्शन जसे सर्वत्र होते, तसे दर्शन अन्य कोणत्या धर्मात होते का ? आपण सनातनी आहोत, जे आपले आदिवासी, वनवासी बंधु आहेत, त्यांना आपला धर्म, संस्कृती आणि पूर्वाजांची माहिती दिली पाहिजे. धर्मच व्यक्तीला जोडू शकतो. देशात जातीजातींमधील भेद नष्ट केला, तर सर्वांचे आचरण व्यवस्थित होईल.’’
‘‘सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहिल्यानंतर आम्ही पुष्कळ प्रसन्न झाले आहोत. हिंदु हितासाठी सनातन संस्थेचे जे प्रयत्न चालू आहेत, ते चांगले आहेत’’, असे सांगून प.पू. प.पू. अग्नीपिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर श्रीमद् रामकृष्णानंद महाराजांनी सनातनच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. |