सर्व साधनांमध्ये नामस्मरणच श्रेष्ठ साधन !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे; पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्कृपाच पाहिजे. आपल्या शरिरात जसे मुख्य हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा. योगामध्ये योग करेपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)