खाणीतील दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. चांगला प्रपंच, म्हणजे सहज न सापडणारी रक्तातील साखर आहे. आयुष्य चालले आहे, उद्याचा भरवसा नाही, तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा. प्रपंचात न्यूनाधिक होणारच. तुम्ही असला तरी आणि नसला तरी तो चालूच रहातो. नाम इतके घ्यावे की, नामात शेवटचा श्वास जाईल, याची खात्री वाटली पाहिजे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)