प्रपंचाची आम्हाला आवश्यकता किती आहे ? मनुष्य फिरायला जातांना हातात काठी घेतो. त्याला ‘हातात काठी घेणे, हे भूषण आहे’, असे कुणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच आवश्यकता आहे. हा प्रपंच करत असतांना त्याची आसक्ती अल्प होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत. त्यासाठी स्वतःचे आचार, विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे आवश्यक आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो, तर निवृत्तीमध्येच जाऊ; कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तीपरच आहे, यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा व्यवसाय करूया, म्हणजे त्याचीच लाभ-हानी होईल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)