बेळगाव येथील श्रीमती लक्ष्मी गुरव यांना सद्गुरु स्वाती खाडये यांच्या जाहीर प्रवचनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘नंदिहळ्ळी गावात सद्गुरु स्वाती खाडये यांचे जाहीर प्रवचन झाले. त्या वेळी बेळगाव येथील श्रीमती लक्ष्मी गुरव यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरू स्वाती खाड्ये

१. सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर मला वातावरणात थंडावा आणि शांतता जाणवत होती.

२. सद्गुरु स्वाती खाडये बोलत असतांना ‘त्या साक्षात् श्री दुर्गादेवी आहेत’, असे मला जाणवत होते.

३. सर्व जिज्ञासू लक्ष देऊन सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन ऐकत होते.

४. सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन झाल्यावरही जिज्ञासू बसून होते. त्यांना ‘कार्यक्रम संपूच नये’, असे वाटत होते. काही जिज्ञासूंनी तसे बोलूनही दाखवले. काही जिज्ञासूंनी सांगितले, ‘‘असे मार्गदर्शन वारंवार व्हायला हवे.’’

५. सद्गुरु स्वातीताईंचे प्रवचन झाल्यानंतर गावात ४ नवीन साधना सत्संग चालू झाले.

६. साधकांमध्ये संघभाव निर्माण झाला.’

– श्रीमती लक्ष्मी गुरव, बेळगाव (२५.३.२०२४)