भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

प्रकरण ३

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचे ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत. ‘धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।’

(महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११) अर्थ : धर्म प्रजेची धारणा करतो. प्रजेला धरून ठेवतो. सर्व प्रजा धर्मबंधनांनी बांधलेली असे.

‘अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९११), म्हणजे ‘अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे, तेच त्याने करावे, असे ईश्वराचे मनोगत आहे’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘४ वर्ण आणि त्यांची कर्तव्ये, जातींच्या उत्पत्तीचा उद्देश अन् ब्राह्मणांमधील जाती’, यांविषयी वाचले. आज त्याचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(लेखांक ८)

लेखांक ७. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/805407.html

४. जातीव्यवस्थेचे महत्त्व !

‘A vision of India’ या पुस्तकात लेखक सिडने लो म्हणतो, ‘Caste provides every man, with his place his carrier, his occupation, his circle of friends. It makes him, at the outset, a member of a corporate body, it protects him. It ensures him companionship and a sense of community with others in like case with himself. The caste organisation is to the Hindu, his club, his trade union, his benefit society, his philanthropic society.’

भावार्थ : ‘वर्ण-जातीव्यवस्था प्रत्येक माणसाला समाजातील स्थान, प्रतिष्ठा, व्यवसाय आणि मित्रमंडळी मिळवून देते. जन्मासमवेतच ती त्याला समाजाच्या एका बांधीव गटाची सदस्य बनवते. ती त्याचे संरक्षण करते, त्याला जोडीदार, सहप्रवासी मिळवून देते आणि सामुदायिक जीवनाची त्याला हवी तशी निश्चिती देते. जातीव्यवस्था ही हिंदु माणसासाठी त्याचा परिवार, व्यावसायिक संघ, साहाय्यक समुदाय आणि परोपकारी सेवा संस्थाच आहे.

५. जातीच्या संदर्भातील विविधांगी विचार !

अ. I do regard varnashram as a healthy division of work. There is no question with me of superiority or inferiority. It is purely a question of duty. (Young India, 23-4-1925)

भावार्थ : वर्णाश्रमाला मी केवळ कामाची उत्तम शिस्तबद्ध विभागणी समजतो. त्यात उच्च-नीचतेचा काही संबंध नाही, असे मला वाटते. हा केवळ कर्तव्याचा प्रश्न आहे.

आ. ‘‘Lord Krishna says, all varna are created by me, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३) म्हणजे ‘ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह मी निर्माण केला आहे.’  i.e. I suppose, by birth. The law of varna is nothing, if not by birth.’’ (Young India, 24-11-1927)

भावार्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘सर्व वर्ण मी उत्पन्न केले आहेत, म्हणजे मला वाटते, जन्माप्रमाणेच, जन्माप्रमाणे नसेल, तर जातीपद्धतीला काहीच अर्थ नाही.’

इ. मेरिडिथ टाऊनशेंड म्हणतात,  ‘‘I firmly believe caste to be a marvelous discovery, a form of socialism, which through ages has protected Hindu society from the worst of industrial and competitive life.’’

भावार्थ : जातीपद्धत हा एक अद्भुत शोध असून तो समाजवादाचाच एक आविष्कार आहे. या पद्धतीने हिंदु समाजाला युगायुगांपासून औद्योगिक आणि स्पर्धात्मक जीवनातील दोषांपासून संरक्षिले आहे.

भारतीय सामाजिक जीवनाचे सामान्यपणे स्वरूप याप्रमाणे आहे. कर्तव्य हा याचा प्राण आहे. तेही ईश्वरदत्त आणि जन्मसिद्ध. ‘सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४८) म्हणजे ‘हे कौंतेया (अर्थात् कुंतीपुत्र अर्जुना), सदोष असले, तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये.’ भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, ‘जन्माने प्राप्त झालेले कर्म अल्प दर्जाचे वाटले तरी ते सोडू नये’; कारण ‘स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४८), म्हणजे ‘त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो.’

ई. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावर भाष्य करतांना म्हणतात,

‘तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९१७

अर्थ : हे विरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता, ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते.’ हा स्वकर्मकर्तव्याचा आग्रह तरी का ? हेही समजून घ्या. भारतीय संस्कृती अध्यात्मप्रधान आहे. ती केवळ भौतिक विश्व मानत नाही. ती ‘ईहवादी’ नाही. परलोक, पुनर्जन्म यांवर तिचा विश्वास आहे. ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजीवनाचे अंतिम साध्य आहे. ते कसे प्राप्त होईल ?

स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा हरितोषणात् ।
साधनं प्रभवेत्पुंसां वैराग्यादि चतुष्टयम् ।।

अर्थ : स्वतःच्या वर्णाश्रमधर्मानुसार आचरणाने, तपाने, परमेश्वराला संतुष्ट करण्याने मनुष्याला वैराग्य आदी चार साधने (वैराग्य, यम, नियम आणि स्वाध्याय) प्राप्त होतात.

(क्रमशः)

– भारताचार्य धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

लेखांक ९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/806135.html