Threat To Shri Ram Sena Helpline  : श्रीराम सेनेच्या ‘हेल्पलाईन’वर ४ दिवसांत धमकीचे १७ दूरभाष !

‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु मुलींसाठी ४ दिवसांपूर्वीच चालू केली आहे ‘हेल्पलाईन’ सेवा !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या हिंदु युवती आणि महिला यांच्या रक्षणासाठी श्रीराम सेनेने ‘साहाय्य दूरभाष क्रमांक’ अर्थात् ‘हेल्पलाईन’ सेवा चालू केली आहे; परंतु या साहाय्य दूरभाष क्रमांकावर ४ दिवसांत धमकीचे १७ दूरभाष आले आहेत, अशी माहिती श्रीराम सेनेचे नेते गंगाधर कुलकर्णी यांनी दिली.

श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, बागलकोटे आणि हुब्बळ्ळी जिल्हा केंद्र येथे २९ मे २०२४ या दिवशी ९०९०४४३४४४ या साहाय्य दूरभाष क्रमांकाला प्रारंभ केला. ४ दिवसांत ४०० हून अधिक दूरभाष आले आहेत. या माध्यमातून ३७ मातांनी, ४२ प्रोत्साहन देणार्‍यांनी, तसेच ५२ लव्ह जिहाद पीडित तरुणींनी आमच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे, तर आमच्या कार्याचे अभिनंदन करून महिला, अधिवक्ते आणि काही माध्यमांनी दूरभाष करून ‘चांगले कार्य करत आहात’, अशी स्तुतीदेखील केली. तथापि आम्हाला धमकीचे १७ दूरभाषही आले आहेत. यावरून आम्हाला एक स्पष्ट झाले की, आमचा साहाय्य दूरभाष योग्यरित्या कार्य करत आहे. आमच्या साहाय्य दूरभाषामुळे विरोधकांना चेतावणी मिळाली आहे. त्यातच आम्हाला सगळ्यांकडून व्यापक प्रोत्साहन मिळत आहे.