आजकाल कित्येक बालरोगतज्ञ लहान मुलांना ‘दूध पिऊन बद्धकोष्ठ होतो’, असे सांगून दूध बंद करायला लावतात, असे दिसते. दूध हे सारक, म्हणजे शौचाला साफ करवणारे असते. या विरोधाभासाची सांगड कशी घालायची ?
आयुर्वेदाचे ग्रंथ सांगतात, ‘दुधाचे गुणधर्म हे व्यक्तीची प्रकृती आणि दोषांची अपेक्षा यांनुसार काम करतात.’ त्यामुळे पित्त अधिक असलेल्या व्यक्तींमध्ये सारक काम करणारे तेच दूध कफ अधिक असलेल्या व्यक्तींमध्ये मात्र बद्धकोष्ठ निर्माण करते. याकरताच कफाचा वारंवार त्रास होणार्या लहान मुलांमध्ये आम्ही वैद्य काही काळ दूध बंद करायला लावतो. आयुर्वेदात ‘सब घोडे बारा टक्के’ (सगळे घोडे १२ टक्क्यांप्रमाणे, म्हणजे सर्वांना एकच नियम) असा नियम नसून सगळ्याच विषयांमध्ये तारतम्य बाळगणे अपेक्षित असते. हीच या शास्त्राची परिपक्वता, महती आणि सौंदर्य आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.